येवला - स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने नेहरू
युवा केंद्र नाशिक, खटपट युवा मंच, येवला, युवा विकास केंद्र, येवला व
जगदंबा एज्युकेशन सोसायटी, मातोश्री एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त
विद्यमाने दि. 12 ते 19 जानेवारी दरम्यान संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च
माध्यमिक विद्यालय, बाभुळगाव येथे राष्ट्रीय युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात
आले होते. राष्ट्रीय युवा सप्ताहांतर्गत संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद जयंतीदिनी राष्ट्रीय युवादिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिनी वक्तृत्व स्पध्रेत लहान व मोठय़ा गटात एकूण 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पध्रेसाठी परीक्षक म्हणून आर.पी. भालेराव, एस.जी. शितोळे यांनी काम पाहिले, तर सुंदर हस्ताक्षर स्पध्रेत 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वामी विवेकानंद सुंदर हस्ताक्षर काढून आदरांजली वाहिली. सदर स्पध्रेचे आयोजन व परीक्षण एच. डी. भामरे, वाय. बी. जगझाप, रवींद्र गायकवाड, एस. व्ही. हाके यांनी केले. चित्रकला स्पध्रेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या 300 विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे चित्र रंगविले. स्पध्रेच्या आयोजनासाठी चित्रकला शिक्षक संतोष खंदारे, विशाल भालेराव, धनंजय दातीर यांनी परिश्रम घेतले. काव्य वाचन स्पध्रेसाठी कवी संजय शेटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शेटे यांनी आपल्या कविता सादर करुन विद्यार्थ्यांना काव्य लेखन संदर्भात मार्गदर्शन केले. काव्य वाचन स्पध्रेत विद्यार्थ्यांनी पाठय़पुस्तकातील काव्यांबरोबरच मराठी, हिंदी काव्यांचे गायन केले. एन. आर. मोरे यांनी प्रास्ताविक व अतिथी परिचय करून दिला. आर. बी. आहिरे यांनी आभार प्रदर्शन केले. स्पध्रेचे परिक्षण रोहिणी केंगे, शीतल कदम, एस. टी. देसले यांनी केले. निबंध स्पध्रेचे परिक्षण आर. एन. सुराशे, योगिता जाधव, बी. बी. वानखेडे, ए. ए. अन्सारी यांनी केले. रांगोळी स्पध्रेचे परिक्षण मुकेश लचके, संतोष खंदारे, पी. डी. आहेर, व्ही. एस. डबे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य जी. एस. येवले, ए. जी. कदम, खटपट युवा मंचचे मुकेश लचके यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी व्ही. आर. परदेशी, डी. एस. खोकले, प्रदीप पाटील, एस. एम. मुंढे, एस.आर. कटय़ारे, गणेश सोनवणे, दामू होंडे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. |