येवला - अंदरसूल
येथे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर एसटी बस व दुचाकी अपघातात वैजापूर
तालुक्यातील दोघेजण ठार झाले आहेत. त्र्यंबकेश्वरहून लोणारकडे जाणारी
एसटीबस (क्रमांक एमएच४0एन८७१४) येवल्याकडे येणारी हिरो होंडा दुचाकी
(क्रमांक एमएच २0 बीबी ३७५९) यांच्यात अंदरसूल येथील वळणावर अपघात झाला. या
अपघातात दुचाकीस्वार साजिद शेख (२0) रा. बाभूळगाव बुद्रुक, ता. वैजापूर हे
दोघे ठार झाले.
सदर घटना आज सकाळी ११.३0 वा. घडली. दोघे दुचाकीस्वार
येवला येथे एका विवाहसमारंभासाठी येत होते. दरम्यान, या प्रकरणी तालुका
पोलिसांत गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.