येवला- येवल्यातील श्री.चेतन कोळस यांना नाशिक जिल्हा पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देणेत आला. त्याबद्दल त्यांचे नगराध्यक्ष निलेश पटेल मुख्याधिकारी डॉ.मेनकर यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. तसेच येवला शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक श्रावण सोनवणे यांनीही त्यांचा सत्कार केला . चेतन कोळस हे झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असून त्यांनी आपल्या कॅमेऱ्याने अनेक समस्या मांडलेल्या आहेत. अल्प वयातच त्यांना पत्रकारितेतील मानाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. येवलान्यूज.कॉमला त्यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.