येवला - येवला मुख्यालयी न राहता असलेबद्दलचे खोटे दाखले जोडून
संबधित विभागाची दिशाभूल करुन शासनाची फसवणूक करणार्या जिल्हापरिषदेच्या
34 शाळेच्या 24 शिक्षकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, वरिष्ठ
अधिकार्यांच्या आदेशाचे अवमान करणार्या मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची
कारवाई करावी अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा येवला एज्युकेशन अँण्ड सोशल
डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीने गटविकास अधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात
आला. तालुक्यातील जि.प. च्या उर्दू शाळेतील बहुतांश शिक्षकांनी मुख्यालयी न राहणेबाबत खोटे व बनावट दाखले जोडले आहेत. ज्या ठिकाणचे दाखले जोडण्यात आले त्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणताही शिक्षक रहात नसल्याचे आढळून आले. काही घरे पडलेल्या अवस्थेत तर एकाच घरात रहात असल्याचे सात दाखले जोडलेले आहेत. पत्ते दिलेल्या काही ठिकाणी जरी कामाचे कारखाने आहेत. सय्यद अहमदअली मुनसफअली, हिना कौसर मिरजा मुमताज, रुबीना कौसर शाकील अहमद, अन्सारी मो. इमराना अ. करिम, अतिकुर रहेमान मो. इसमाईल, अबरार आलम मो. अनवर, नविद अंजुम नरुलहुदा, अन्सारी असफाक वहाब, अन्सारी अनिसा नेहाले, शबीना मुख्तार अहमद, नसरीन अंजुम अजित रहेमान, सकिना नैय्याबा, अ. रहीम, नाविद अनंजुमन, सय्यद, शहजाद, हारुन रशिद, काझी एजामुद्दिन बसीरुद्दीन, सय्यद आशिया सय्यद शबीर, फारुकी मुजीबर रहेमान, जाहिद अहमद, आजीज रहेमान, शेख अकबर शेख नूर, शेख रशिद सलिम आदी शिक्षकांनी संबंधित विभागची दिशाभुल करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशी बनावट दाखले जोडणार्या शिक्षकांविरुद्ध कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जि.प. उर्दू प्राथ. शाळांना सर्वशिक्षा अभियान अंतर्गत केंद्र शासन व अल्पसंख्याक निधीतून गणवेशासाठी निधी मिळाला असून तो मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश पत्राद्वारे दिले. त्यास मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखवून आदेशाचा अवमान केला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. 4 फेब्रुवारीपर्यंत संबधितांवर कारवाई न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर मो. फारुक अब्दुल रशिद, अन्सारी मोबीन हक, रईस अहमद मो. रमजान, निसार निंबुवाले, ताहेर शेख, शकुर मुलतानी, शकिल अन्सारी, शेख रियाज वाहिद, अन्सारी जमिल हसन, अन्सारी अख्तर अय्युब, खालिफ मुश्ताक, शब्बीर, अन्सारी मोईमुद्दीन गणी, अश्पाक मोहमंद इब्राहिम शेख आदींच्या स्वाक्षर्या आहेत. |