समाजाभिमुख शिक्षक
पुरस्कार समता प्रतिष्ठान संचलीत समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव रास्ता
येथील मुख्याध्यापक दिनकर दाणे यांना प्राचार्य नलिनीताई वैद्य समाजभिमुख
शिक्षक पुरस्कार साने गुरुजी स्मारक पुणे येथे प्रदान करण्यात आला. पाच
हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह, शाल आणि प्रमाणपत्र देऊन दाणे यांना
गौरविण्यात आले. राष्ट्रसेवादल कार्यकारी विश्वस्त अभिजित वैद्य,
राष्ट्रीय समन्वयक सोशालिस्ट महिला सभा वर्षा गुप्ते, राष्ट्रसेवादलचे
राष्ट्रीय अध्यक्ष अरविंक कपोले, केंद्रीय आरोग्य सेवा समिती सदस्य डॉ.
गितांजली वैद्य, माजी गृहराज्यमंत्री डॉ. भाई वैद्य, राष्ट्रसेवादल
विश्वस्त सुरेश देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, सुधाताई
पाटील, पंडीत मढवई, बाबासाहेब कोकाटे, रामनाथ पाटील, कानीफनाथ मढवई, सलिल
पाटील, हरिश्चंद्र सोनवणे, भाऊसाहेब मगर आदींनी अभिनंदन केले.