येवला शहरातील सर्वे नं. ३९0७ व
३९0८ या भूखंडावरील अतिक्रमित व्यापारी गाळे हटविण्यासाठी २१ डिसेंबरपासून
सलग तीन दिवस नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार
आहे.
सदर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने आज, पालिका सभागृहात तहसीलदार हरिष सोनार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वे नं. ३९0७ व ३९0८ मधील गाळेधारकांची बैठक घेतली. सदर बैठकीत पालिका मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी गाळेधारकांनी स्वत:हून बांधकाम काढून
घ्यावीत अन्यथा प्रशासन बांधकाम हटवून त्याचा खर्च संबंधित गाळेधारकांकडून वसूल करेल असा इशारा दिला.
पालिकेने अतिक्रमण हटविण्यात दुमत नाही मात्र पालिकेने प्रथमत: व्यापारी संकुल बांधण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी माजी नगरसेवक नितीन काबरा यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाला स्टॅम्पपेपरवर हमीपत्र लिहून देण्यास गाळेधारक तयार असल्याचेही काबरा यांनी स्पष्ट केले. रा.काँ.चे प्रांतिक सदस्य किशोर सोनवणे यांनी पालिकेने पहिले सर्वे नं. ३८0७ मधील विस्थापित गाळेधारकांचे पुनर्वसन करावे व मगच सर्वे नं. ३९0७ व ३९0८ मधील व्यापारी गाळे हटवावेत, अशी मागणी केली.
सर्वे नं. ३८0७ वरील व्यापारी गाळे पाडून पाच वर्षे झाली. यात व्यावसायिक विस्थापीत झालेच; परंतु पालिकेचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वे नं. ३९0७ व ३९0८ बाबत तसे घडू नये, असेही सोनवणे यांनी, भूमी अभिलेख, नगरपालिका आणि महसूल विभागात या जागा संदर्भात विसंगती आढळते ही बाब मांडून खरा नकाशा, आराखडा, सीमारेषा कुठली असा प्रश्न उपस्थित होता.उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. आदेशाचे पालन सर्वांनाच करावे लागणार असल्याने सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार हरिष सोनार यांनी केले. बैठकीस सुरेश सावंत, अनिल कासार, सुधीर सोनवणे, दत्तात्रय शुळ, विठ्ठल नागपुरे, संजय हिरे, विजय लोणारी, मयूर पटेल, चमन पटेल, सुरेश कासार, बाळू पाटोदकर, श्याम दोडे, सतीश पाबळे, निरंजन परदेशी, प्रकाश लाड, रवि घायाळ आदिंसह गाळेधारक उपस्थित होते.