नाशिक जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी येवल्याच्या संचालिका कल्पनाताई कुर्हे यांची बिनविरोध निवड झाली. दूध संघाच्या इतिहासात अकरा वर्षानंतर अध्यक्षपदाची संधी महिलेला मिळत आहे. नाशिकच्या तहसीलदार सुचिता भामरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत कुर्हे यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या निवडीबद्दल येवल्याचे माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँक संचालक अँड. माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, सहकार नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष नीलेश पटेल, उषाताई शिंदे, माजी नगराध्यक्ष पंकज पारख, अरुण काळे, राजेंद्र लोणारी, पं. स. माजी सभापती महेंद्र काले, रामदास काळे, सुदाम सोनवणे आदींसह अनेकांनी अभिनंदन केले.