अतिक्रमित गाळेधारकांनी साहित्य हलविण्यास केली सुरुवात

 

येवला शहरातील सर्व्हे क्रमांक ३९०७ व ३९०८ मधील अतिक्रमित गाळेधारक, व्यावसायिकांनी मंगळवारी रात्रीपासून आपापल्या गाळ्यांमधील साहित्य हलविण्यास सुरुवात केली. सुमारे ९० गाळेधारकांची अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांनी येथील साहित्य मिळेल त्या वाहनाने इतरत्र आज मोठ्या प्रमाणावर हलविले. व्यावसायिकांची साहित्य हलविताना चांगलीच दमछाक होताना दिसून आली. शहरातील मुख्य बाजारपेठेत या व्यावसायिकांचे गाळे असल्याने मोठ्या प्रमाणावर साहित्य दुकानांमध्ये आहे. पर्यायी जागाही येथील व्यावसायिकांना उपलब्ध न झाल्याने व्यावसायिकांना साहित्य कुठे हलवावे हा प्रश्‍नही पडला. अतिक्रमित जागेत गणेश चाळ ही सर्वांत जुनी असून सन १९७० मध्ये ठरावाद्वारे पालिकेने व्यापार्‍यांना येथे व्यवसायासाठी जागा दिल्या होत्या.  


थोडे नवीन जरा जुने