एकलहरे (नाशिक) येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री
अभियांत्रिकी महाविद्यालयाला संशोधन केंद्राची (पी.एचडी)मान्यता मिळाली
आहे. अभियांत्रिकीच्या कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन
इंजिनिअरिंग या दोन शाखांसाठी ही मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील हा
बहुमान मिळवणारे हे पहिले महाविद्यालय आहे, अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी
कुणाल दराडे, प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी दिली. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील हे मोठे पाऊल आहे. विषयांच्या संशोधनासाठी संगणक शाखेला डॉ. ए. व्ही. देशपांडे, डॉ. राजेश इंगळे, डॉ. सारंग जोशी, डॉ. एस. एन. माळी, डॉ. वर्षा पाटील, डॉ. एस. एस. साने व डॉ. एस. जे. वाघ, तर ई अँण्ड टीसी शाखेसाठी डॉ. एम. एस. देशपांडे, डॉ. व्ही. जे. गोंड, डॉ. जी. के. खराटे, डॉ. ए. के. कुरेशी व डॉ. एन. पी. फुटाणे हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. मातोश्री शिक्षण संस्थेचे संस्थापक नरेंद्र दराडे, अध्यक्ष किशोर दराडे, तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून केंद्राला मान्यता मिळाली आहे, असेही कुणाल दराडे यांनी सांगितले. महाविद्यालयात संगणक, आयटी, ईटीसी, मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल या पदवी अभ्यासक्रमासह संगणक, ईटीसी मेकॅनिकल शाखांचा एम.ई. अभ्यासक्रम सुरू आहे तसेच एकलहरे येथे तंत्रनिकेतन एमबीए, फार्मसी व नर्सिग महाविद्यालयही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. |