येवल्यात विकासकामांचे भूमिपूजन



येवला शहरात जी काही विकासकामे सुरूआहेत ती शासनाच्या निधीतूनच आज, फुकट काहीच मिळत नाही. लोक वर्गणीअभावी विकासकामांना अडचणी येतात. पालिकेने आपले उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. पालिका सक्षम होणे आवश्यक असून, विकासासाठी सर्व पक्षियांनी एक व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला शहरातील सर्वे नं. ३८0७ या भूखंडावर व्यापारी संकुल बांधाकामासह जिल्हास्तर नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
येवला शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसाठी सुलभ शौचालये बांधून खुली केली आहेत. स्पष्ट करून भुजबळ म्हणाले, अतिक्रमण पाडण्याची इच्छा नव्हती. कुणाला त्रास द्यावा असे वाटत नाही मात्र आपल्या पैकीच कुणी तक्रार केली. न्यायालयाच्या आदेशानेच सर्वे नं. ३८0७ वरील अतिक्रमण पाडण्यात आले. न्यायालयापुढे कोणाचे काही चालत नाही. आता वर्षभरात व्यापारी संकुलाचे बांधकाम करून विस्थापितांना प्राधान्य द्या, असेही भुजबळ यांनी सांगितले.
नगराध्यक्ष नीलेश गुजराथी यांनी नगरपालिका तोट्यात आहे; परंतु शहर विकासावर त्याचा परिणाम होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. जयश्री पवार यांनी जिल्ह्यातील विकासाचा आढावा घेतला.
प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी, तर सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमात अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, नरेंद्र दराडे, सौ. राधिका कळमकर, हरिभाऊ जगताप, डॉ. सुधीर जाधव, संभाजी पवार, अरुण थोरात, किशोर सोनवणे, प्रवीण गायकवाड, साहेबराव मढवई, दीपक लोणारी, बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने