शासनाने ओबीसी, एन.टी, एसबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना काही व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णय घेतलेला आहे त्या विरोधात येवल्यातील विद्यार्थ्यांनी येवला सहसिल कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह केला. शासनाच्या या निर्णयाने विशेषकरून बीसीएस, बीबीएम,बीबीए,बीसीए, एएनएम बीफार्मा या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांना भुर्दंड पडणार आहे. सदर मोर्च्याच्या प्रसंगी शासन निर्णयाच्या विरोधात येवल्याचे तहसिलदार हरिष सोनवणे यांना साईराज शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वलता कॉलेजचे विश्वस्त भूषण लाघवे, समता परिषदेचे मोहन शेलार, ज्येष्ठ समाजसेवक व पत्रकार चंद्रकांत साबरे, बबनराव साळवे पवन भांडगे यांनी निवेदन दिले.