विनोदामुळे मानवी जीवनातील दु:खे सुसह्य होऊन जीवन फुलते.......लेखक, कवी एस.एन.देशपांडे

साहित्य मानवी जीवनाचा आरसा असले तरी साहित्याचा परीघ बदलू लागला आहे. वाचकांना विनोदी साहित्यात अन् कवितात अधिक स्वारस्य वाटत आहे. त्यामुळे यापुढे विनोदी साहित्याला अधिक पसंती मिळणार आहे. मानवी जीवनातील दु:खांवर विनोद टॉनिक ठरत आहे. विनोदामुळे मानवी जीवनातील दु:खे सुसह्य होऊन जीवन फुलते, असे प्रतिपादन मनमाड येथील लेखक, कवी एस.एन.देशपांडे यांनी केले.
बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जावे विनोदाच्या गावा’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.एस.येवले होते. तर उपप्राचार्य ए.जे.कदम, प्रा.मनोज खैरे यांची प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीपूजन दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य येवले यांनी देशपांडे यांचा सत्कार केला. देशपांडे यांनी एका तासाच्या व्याख्यानात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विनोदी व्याख्यानातून खिळवून ठेवले.
प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संतोष विंचू यांनी केले. प्रा. किरण गायकवाड, प्रा. किरण पैठणकर, प्रा. नवनाथ जाधव, प्रा. बी. ए अनर्थे, प्रा. आदिती वानखेडे, प्रा. रेणुका कुवकर, आर.पी.भालेराव, निवृत्ती मोरे, सुभाष शितोळे, एच.बी.भामरे, रवींद्र गायकवाड, पी.डी.आहेर, गणेश सोनावणे, दामू होंडे आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने