येवला,शहरातील बसस्थानक, जनता व मुक्तानंद विद्यालय परिसरात,
सार्वजनिक ठिकाणी महिलांना व मुलींना दिसेल अशा पद्धतीने जाणून बुजून
गैरवर्तन करताना आढळून आलेल्या आठ टवाळखोरांवर शहर पोलिसांची कारवाई केली
आहे. मुजमील आयुब सौदागर (वय 19, रा. मुलतानपुरा), अक्षय बाळासाहेब लभडे (रा. टेलिफोन कॉलनी), जितेंद्र उमेदसिंग राजपुरोहित (वय 18, रा. श्रीराम कॉलनी), आकाश गोपीनाथ पांगुळ (वय 19 रा. सप्तशृंगी मंदिराजवळ, सर्व रा. येवला), राहुल अशोक गायकवाड (वय 20), महेश सुधाकर गायकवाड (वय 27, रा. धुळगाव, ता. येवला), ज्ञानेश्वर श्रावण बर्डे (वय 18, रा. थडी सारोळे, ता. निफाड), किरण विक्रम मोरे (वय 22, रा. कोंडार (ता. नांदगाव) आदी आठ युवक सार्वजनिक ठिकाणच्या परिसरात टवाळखोरी करताना आढळून आल्याने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता वैयक्तिक जाचमुचल्यावर न्यायालयाने सोडून दिले. दोन जामिनदारांसह 1 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे, तर पुरोहित याने गुन्हा कबूल केल्याने त्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलीस उपअधीक्षक समाधान पवार यांच्या आदेशान्वये पो. नि. श्रावण सोनवणे, पांडुरंग खेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील युवतीवर अत्याचार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली. पुढील कारवाई एस.एन. डी. बाभुळगाव परिसरात विभत्स वर्तन करताना आढळून आल्यास केली जाईल, असे पोलीसांनी सांगितले. |