येवला, दि. १९ (प्रतिनिधी) - शहरातील सर्व्हे क्रमांक ३९०७ व ३९०८ या
पालिकेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमित व अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी
पालिका प्रशासनाने आज जय्यत तयारी पूर्ण केली. २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता
मोहिमेला सुरुवात होणार असून सुमारे ९० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस बंदोबस्तासह पालिकेने अतिक्रमणे पाडण्यासाठी यंत्रणाही आज सज्ज ठेवली
आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सन २००३ मध्ये जनहित याचिका क्रमांक १०९ मधील निर्णयानुसार पालिकेने अतिक्रमण हटविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा आज सज्ज केली. यापूर्वी सर्व्हे क्रमांक ३९०७ व ३९०८ मधील अतिक्रमित गाळेधारकांची तहसीलदार हरिश सोनार यांच्या उपस्थितीत पालिका मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी बैठक घेऊन अतिक्रमणे २१ डिसेंबरपूर्वी काढून घेण्याच्या गाळेधारकांना सूचना दिल्या असून अतिक्रमणे स्वत:हून न हटविल्यास बांधकाम निष्कासनाचा खर्च संबंधित गाळेधारकांकडून वसूल करण्याचेही पालिका प्रशासनाने म्हटले आहे. रविवारी १६ डिसेंबर रोजी पालकमंत्री छगन भुजबळांची अतिक्रमित गाळेधारकांनी भेट घेऊन गाळे न पाडण्याची विनंती केली असता भुजबळांनीही न्यायालयाचा निर्णय सर्वश्रेष्ठ असतो तो सर्वांना मान्य करावाच लागेल असे सांगितल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेने चांगलीच गती घेतली आहे. सर्व्हे क्रमांक ३९०७ व ३९०८ मधील गणेश चाळीतील गाळे क्रमांक १ ते ९ या व्यावसायिकांनी शनिवार दिनांक १५ डिसेंबर रोजी येवला न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या गाळेधारकांनी आपल्याला पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कुठल्याही नोटिसा प्राप्त झाल्या नसून आमच्या व्यवसायाचे गाळेही पालिकेनेच बांधून दिले असून सदर गाळे ३१ मार्च २०१३ पर्यंत आम्हाला भाडेतत्वावर दिल्याचे याचिकेत म्हटले आहे. पालिकेने ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत या गाळेधारकांकडून भाडेही वसूल केल्याने कुठल्याही अटी-शर्तींचा भंग आम्ही गाळेधारकांनी केलेला नसल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेत स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
पालिका प्रशासनाने मात्र अतिक्रमण हटविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. १२० पोलीस कर्मचारी, २५ महिला पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, एक पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक आदी पोलीस ताफ्यासह बांधकामे निष्कासित करण्यासाठी एक पोकलेन, १० जेसीबी मशीन, १५ ट्रॅक्टर, ३ टिप्पर, २० कामगार, एक ऍम्ब्युलन्स, १ अग्निशमन बंब, पालिकेचे ३०० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.