अंगणगाव शिवारातील एका शेतातील चार्याच्या सुडय़ांना अचानक आग लागून सुडय़ा खाक झाल्या असून, लोखंडी ट्रॅक्टर ट्रॉलीचेही नुकसान झाले. या घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंगणगाव शिवारातील गावठाणात असणार्या शेतातील चार्याच्या सुडय़ांना दुपारी आग लागली. आग इतकी प्रचंड होती की, या आगीत शेतातील चारा, ट्रॅक्टर ट्रॉली, पाईप, शेती अवजारे जळून खाक झाले. यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सोपान गायकवाड, देवराम गायकवाड, नंदू गायकवाड,अप्पासाहेब गायकवाड यांच्या मालकीची शेती औजारे व चार्यांचे जळीतात नुकसान झाले. आग विझविण्यासाठी येवला व मनमाड पालिकेचे अगिAशामक बंब बोलाविण्यात आले होते. नायब तहसीलदार विनायक थविल, पो. नि. श्रवण सोनवणे, स.पो.नि. पांडुरंग खेडकर, तलाठी पांडुरंग केबारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जळीत प्रकरणाची पाहणी केली. तलाठय़ांनी पंचनामा केला असून, शहर पोलीस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद करण्यात आली आहे.