उच्च न्यायालयाच्या
आदेशानुसार शहरातील सव्र्हे क्र. 3907 व 3908 या भुखंडावरील 80बेकायदेशीर
बांधकामे आज पालिकेने जमिनदोस्त केली. उर्वरीत सहा जणांनी न्यायालयातून
स्थगिती आदेश मिळविल्याने त्यांची बांधकामे तशीच ठेवण्यात आली आहे. कै.
नारायणराव पवार व कै. गोविंदनाना सोनवणे या दोन पतसंस्थांना आज निफाड सत्र
न्यायालयाने 4 जाने 2013 पर्यंत बांधकाम न पाडण्याचा आदेश दिला आहे. तसेच
शिंदे, यांनीही निफाड न्यायालयातून स्थगिती आदेश मिळविला. नागपूरे आणि
कापसे यांनी येवला न्यायालयातून तर प्रणव गुजराथी व विजय लोणारी यांनी
स्थगिती आदेश प्राप्त केला आहे. विजय लोणारी यांनी सन 2001 मध्ये मुंबई
उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्याने निकाल
लागेपर्यंत सदरची सर्व बांधकामे तशीच ठेवण्यात येणार आहे. हटविण्यात
आलेल्या बांधकामापैकी 96 गाळ्यांचे पंचनामे आज झाले, उर्वरीत 5 गाळ्यांचे
पंचनामे बाकी असून ते उद्या होतील. सात बांधकामांना न्यायालयाचा स्थगिती
आदेश असल्याने एकूण 108 पैकी 101 बेकायदेशीर बांधकामे पालिकेने बांधकामे
पालिकेने उद्ध्वस्त केली असल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी
सांगितले.
अतिक्रमण हटाव मोहिम....न्यायालयातून स्थगिती आदेश ...............
byन्यूजप्रेस
-
0