येवला तालुका विज्ञान प्रदर्शनाची नुकतीच सांगता झाली. स्वामी विवेकानंद
विद्यालयाच्या स्वयंचलित अग्निशमन यंत्रास प्रथम पारितोषिक विभागीय सहसचिव
शिवनाथ मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आले . दुसऱ्या गटात चेतन दंडगव्हाळ
याने सौर सायकल हे उपकरण बनवेले त्यालाही प्रथम पारितोषिक विभागीय सहसचिव
शिवनाथ मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आले. अंबादास सालमुठे या स्वामी
विवेकानंद विद्यालयाच्या शिक्षकाने सादर केलेल्या व्यवसाय मार्गदर्शन
प्रकल्पालाही प्रथम पारितोषिक पंस सदस्या सौ.शिवांगी वसंत पवार यांच्या
हस्ते देणेत आले. बेटी बचाव प्रकल्पालाही सन्मानित करणेत आले. सदर प्रंसगी
अर्जुन कोकाटे सर, विलास रंधे, भास्कर कोंढरे, रतन बोरणारे हरिभाऊ जगताप,
प्रा.गुमानसिंग परदेशी,प्रा.संजय वाबळे गटशिक्षण विस्तार अधिकारी संजय
कुसाळकर उपस्थित होते.