येवला-वैजापूर राज्य
महामार्गावर कोटमगाव रेल्वे गेटजवळ दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख रुपये
अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना नुकतीच घडली. प्राथमिक शिक्षक साहेबराव
भागवत रा. गवंडगाव, ता. येवला यांनी गंगा दरवाजावरील बँक ऑफ इंडिया शाखेतून
तीन लाख रुपये काढले. सदर पैसे कापडी पिशवीत गुंडाळून भागवत यांनी
दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते आपल्या घराकडे जात असताना कोटमगाव
रेल्वे चौकी बंद असल्याने भागवत तेथे थांबले. दुचाकीच्या डिक्कीतून
पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पैसे घेऊन
येवल्याच्या दिशेने पळ काढला.