येवला तालुका विज्ञान प्रदर्शन 20 डिसेंबरला

 येवला तालुका विज्ञान प्रदर्शन 2012 च्या आयोजन बाबतची सभा जनता विद्यालय येवला येथे नुकतीच झाली. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी चौधरी होते. प्रदर्शन स्वामी विवेकानंदन विद्यालय एरंडगाव येथे दि. 20 व 21 डिसेंबर 2012 रोजी होणार असल्याचे सांगितले. यावेळी एस. पी. कुसाळकर (शिक्षणविस्तार अधिकारी) यांनी प्रदर्शनाचा विषय विज्ञान, समाज व पर्यावरण विज्ञान व समाज हा मुख्य विषय असल्याचे सांगून त्याला अनुसरून सहा विषय उद्योग नैसर्गिक संसाधने आणि त्यांचे संवर्धन, वाहतूक व दळवणळण, माहिती व शैक्षणिक तंत्रज्ञान, सामुदायिक आरोग्य आणि पर्यावरण गणितीय प्रतिकृती असल्याची माहिती दिली. प्रदर्शनीय वस्तूंची दालनांची माहिती दिली. प्राथमिक गट इ. 5 वी ते 8 वी स्वतंत्र दालन, माध्यमिक गट इ. 9 वी ते 12 वी स्वतंत्र दालन, माध्यमिक शिक्षक दालन, प्राथमिक शिक्षक दालन, प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर दालन, लोकसंख्या शिक्षण विषयक प्रतिकृतीचे दालन असणार आहे.याप्रमाणे स्वतंत्र दालनांमध्ये तयार केलेल्या वस्तूंची मांडणी केली जाणार आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रदर्शनीय वस्तूचे सुकाणु समितीच्या मूल्यमापन केले जाणार आहे. बाहय़ परिक्षकाच्या सहाय्याने प्रदर्शनीय वस्तूंचे मूल्यमापन करताना सृजनशीलता उत्स्फूर्त/नावीन्य 20 गुण, शास्त्रीय विचार/तत्त्व/सिद्धांत/पद्धत 15 गुण, तांत्रिक कौशल्य/कारागिरी 15 गुण उपयोगिता 15 गुण, टिकाऊपणा/ ने-आण करण्याच्या दृष्टीने सोयीचे 10 गुण, प्रस्तुतीकरण 10 गुण, कल्पकता 15 गुण या प्रमाणे मुल्यमापन करुन जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधुन 3 वस्तूंची निवउ करण्यात येईल. उच्च माध्यमिक शाळा मधुन 3 वस्तुंची निवड करण्यात येणार आहे. यावेळी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी दिनकर दाणे, कावडे, परदेशी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने