जिल्ह्यातील कार्टिंग एजंटांनी लॉबिंग
केल्यामुळे कांद्याच्या भावात गतसप्ताहापासून मोठी घसरण झाली आहे. कार्टिंग
एजंटांनी चुकीच्या पद्धतीने गेल्या १५ दिवसांपूर्वी रॅक लोडिंग केल्यामुळे
कांदा व्यापारी व शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत सापडला आहे. जिल्ह्यातील कांदा
व्यापारी, तज्ज्ञ शेतकरी व राजकीय विचारवंतांची बैठक लवकरच येवला कांदा
व्यापारी असोसिएशनच्या वतीने यासंदर्भात बोलाविली आहे.
नासिक जिल्ह्यात एकूण कार्टिंग एजंट आहेत. यात निफाड तालुक्यातील खेरवाडी व कुंदेवाडी, लासलगाव, मनमाड, येवला व नांदगावच्या कार्टिंग एजंटांचा समावेश आहे. या कर्टिंग एजंटांनी लॉबिंग करीत गेल्या १५ दिवसांपूर्वी बनारस येथे रॅक लावला. बनारसमध्ये सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने पर्यायाने शेतकर्यांनाही व्यापार्यांबरोबर आर्थिक फटका बसला आहे.
क्षमता नसतानाही कार्टिंग
एजंटांनी या ठिकाणी अधिक रॅक लावल्याने येथील कांदा व्यापार्यांनी कांदा घेण्यास उत्साह दाखविला नाही. पर्यायाने कांद्याचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी घसरले आहे. कार्टिंग एजंटांनी चुकीच्या पद्धतीने रॅक लोडिंग केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४०० अधिकृत कांदा व्यापार्यांचे सुमारे २ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. देशातील उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, दिल्ली, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू आदी राज्यातून तसेच परदेशातून कांद्यास चांगली मागणी असतानाही केवळ कार्टिंग एजंटांच्या आर्थिक हव्यासापोटी चुकीचे लोडिंग झाल्याने कांदा भावात घसरण झाल्याची तक्रार कांदा व्यापारी असोसिएशनने केली आहे. चुकीच्या झालेल्या रॅक लोडिंगसंदर्भात व यापुढील काळात रॅक लोडिंग करताना काही चूक होऊ नये, यासाठी कांदा व्यापार्यांना काही महत्त्वाच्या सूचना अथवा मार्गदर्शन करावयाचे असल्यास येवला तालुका कांदा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षांकडे लेखी स्वरूपात कळविण्याचे आवाहन येवला व अंदरसूल कांदा व्यापारी असोसिएशनने केले आहे.
ज्या ठिकाणाहून कांद्याची मागणी असेल, त्याच ठिकाणी कार्टिंग एजंटांनी रॅक लावला पाहिजे. कांदा व्यापार्यांचे आर्थिक नुकसान होणार असले तरी बाजारभावातील घसरणीमुळे पर्यायाने शेतकर्यांनाच फटका बसणार आहे. दिवाळी तोंडावर असताना एक तर कांद्याची आवक कमी, बाजारभावात घसरण हे दुर्दैव आहे. अशा कार्टिंग एजंटांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
- संतू पा. झांबरे, शेतकरी संघटना नेते