येवल्यात २६ नोव्हेंबर रोजी चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

येवला तालुक्यातील एका ग्रामपंचयातीची सार्वत्रिक तर तीन ग्रामपंचयातींच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्या आहेत. २६ नोव्हेंबर रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे.
नायगव्हाण ग्रामपंचयातीची सार्वत्रिक निवडणूक होत असून मानोरी बुद्रुक, सातारे व गुजरखेड ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होत आहे. नायगव्हाण ग्रामपंचायतीच्या एकूण ७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती स्त्री व अनुसूचित जमाती स्त्री राखीव जागांसाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या तीन जागांसाठी तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण पुरुष व सर्वसाधारण स्त्री या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. मानोरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ मधील सर्वसाधारण जागेसाठी, सातारे ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मधील अनुसूचित जमाती व सर्वसाधारण स्त्री या दोन जागांसाठी, गुजरखेड ग्रामपंचायतीतील वार्ड क्रमांक १ मधील अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या २ जागांसाठी, वार्ड क्रमांक २ मधील अनुसूचित जातीसाठी राखीव वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा एकूण ४ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. मतमोजणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
थोडे नवीन जरा जुने