९ नोव्हेंबर ला येवला शहरातील विंचूर रोडवरून १० तोळेच्या आसपास सोने चोरून मोटार सायकल वरून फरार झालेल्या एका संशयीतास येवला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने बुधवार पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. स्टेच बँकेच्या लॉकरमधुन घरी सोनो घेऊन जाणाऱ्या सुमतीलाल भावसार यांचे सोने मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी पळ काढला होता. या गुन्ह्याच्या तपास करताना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेज तपासले असता एक संशयीत टेहळणी करताना दिसत होता. आपली पिशवी खेचणारा हाच इसम आहे असे भावसार यांनी ओळखले . . पोलिस तपासात तो श्रीरामपूर येथील अट्टल चोर सलिम नूरअली इराणी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पो.नि. श्रावण सोनवणे सपोनि पांडूरंग खेडकर, ठाकरे यांनी तपास केला.