अंदरसूल येथे महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन

आजपर्यंत जनतेला उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, विविध उतारे यासारख्या शासकीय कामकाजासाठी तालुकास्तरावर जावे लागत होते, परंतु आता ती शासकीय सुविधा गावातच उपलब्ध झाली असून त्याचा फायदा घेण्याचे आवाहन तहसीलदार हरीश सोनार यांनी केले.
अंदरसूल येथे महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार हरीश सोनार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, उपसभापती हरिभाऊ जगताप, माजी सभापती महेंद्र काळे, युवा नेते मकरंद सोनवणे, सरपंच मथुराबाई सोनवणे, किसन धनगे, ऍड. सुभाष सोनवणे, बाबुराव जाधव, सुदाम सोनवणे, भागीनाथ थोरात आदी उपस्थित होते. महा-ई-सेवा केंद्रातून मिळणार्‍या विविध दाखले व उतार्‍यांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली व खासगी कंपन्यांचे मोबाईल, डिश टीव्ही रिचार्ज, पॅनकार्ड इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असेही यावेळी सांगितले. विशेष म्हणजे यानंतर तहसील कार्यालयातील बरीचशी कामे गावातच होणार असल्याने नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार असून त्रासही कमी होणार आहे. यावेळी चैताली गायकवाड यांना महा-ई-सेवा केंद्राचे प्रमाणपत्र सोनार यांनी प्रदान केले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंडळ निरीक्षक वाघ, तलाठी गांगुर्डे परदेशी, कांतीलाल सोनवणे, रवी गायकवाड, बाळनाथ वाघचौरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार, नवनाथ सोनवणे, अमोल सोनवणे, मारुती सोनवणे, माजी सरपंच पुंडलिक जाधव, संदीप गाडे, भिमाशंकर वाघचौरे, विष्णू जेजुरकर, भिकाजी जाधव, सचिन कळमकर, सूर्यभान जगताप, जगन जगताप, विलास गाडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक हजर होते. सूत्रसंचालन प्रकाश साबरे यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने