शासनाने ऊस दरवाढीसंदर्भात व्यवहार्य मार्ग काढावा ----माणिकराव शिंदे



 पिढ्यान्पिढ्यांपासून शेतकर्‍यांची सुरू असलेली पिळवणूक एकाएकी थांबणार नाही. ऊस दरवाढीसंदर्भात हाच प्रश्‍न निर्माण होतो. दरवाढीसंदर्भात व्यवहार्य मार्ग काढावा अशी मागणी जिल्हा बँक संचालक ऍड. माणिकराव शिंदे यांनी केली आहे.
ऊस दरवाढीसंदर्भात आंदोलक शेतकर्‍यांनी गांभीर्याने विचार करावा असे आवाहन करतानाच जिल्हा बँक संचालक ऍड. माणिकराव शिंदे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या मालकीची सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे. सध्या सहकार तत्त्वावरील कारखानदारी मोडीत निघून खाजगी साखर कारखानदारी उदयास येत आहे. खाजगी क्षेत्राकडे ऊस उत्पादकाची काय अवस्था असते हे सहकार क्षेत्राच्या सहभागापूर्वीचे अनुभव लक्षात ठेवायला पाहिजे. साखरेचे भाव हे कायमस्वरूपी निश्‍चित नसतात. उसाची उपलब्धता, शासनाचे धोरण, परदेशातील साखरेची स्थिती या सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. याचा ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, आ. बच्चू कडू व शरद जोशी या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उभे केलेले आंदोलन स्तुत्य असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने