नगराध्यक्षा राजश्री पहिलवान, उपनगराध्यक्षा भारती येवलेंचा राजीनामा इच्छुकांच्या हालचाली गतिमान

दहा महिन्यांची टर्म पूर्ण होताच आज शहराच्या नगराध्यक्षा राजश्री पहिलवान व उपनगराध्यक्षा भारती येवले यांनी आपल्या पदांचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. दरम्यान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शहरात इच्छुक नगरसेवकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
येवला नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे १६, कॉंग्रेसचा एक, अपक्ष दोन नगरसेवकांसह एकूण १९ नगरसेवकांचे संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका राजश्री पहिलवान व उपनगराध्यक्षपदासाठी भारती येवले यांना संधी दिली गेली होती. मात्र दोघांनाही पदांची संधी देताना पालकमंत्र्यांनी १० महिन्यांची टर्म दिली. आज दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे नगराध्यक्षा राजश्री पहिलवान व उपाध्यक्षा भारती येवले यांनी राजीनामा सादर केला. यावेळी बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादीचे पालिका गटनेते प्रदीप सोनवणे, प्रवीण पहिलवान, भास्कर येवले आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने