अर्जुन पुरस्कार’ विजेत्या कविता राउतचा पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते सत्कार

नाशिक - केंद्रीय क्रीडा खात्याने नाशिकची अॅथलीटस्‌ कविता राऊतला 'अर्जुन'
या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरव करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. या
पार्श्वभूमीवर नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी कविताचा पुष्पगुच्छ देऊन
आणि मिठाई भरऊन सत्कार केला. नाशिकमध्ये कवितासह इतर अॅथलीटस्‌च्या सरावासाठी
डिसेम्बर अखेर पर्यंत सिंथेटिक ट्रॅकची उभारणी केली जाईल असे भुजबळ यांनी
यावेळी जाहीर केले. यासाठी शासनाला साडेतीन कोटी रुपये खर्च येणार आहे.
लंडन ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी कविताला नाशिकमध्ये सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक असता
तर कविता अधिक चांगली कामगिरी करू शकली असती, त्यामुळे आडगाव नजीक उभारण्यात
येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात डिसेम्बर पर्यंत सिंथेटिक ट्रॅकची उभारणी
केली जाईल असे भुजबळ म्हणाले. यावेळी कविताचे प्रशिक्षक विजयेंद्र सिंह,
ओ.बी.सी. विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, वास्तूविशारद संजय पाटील,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे
जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन महाजन उपस्थित होते.
राजवर्धन राठोड अध्यक्ष असलेल्या समितीने दोघा ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूंची
'खेलरत्न' आणि 25 क्रीडापटूंची 'अर्जुन' पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्यात
कविताचाही समावेश आहे. राज्याचे पर्यटन, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ
यांनी ऑलम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेता नेमबाज विजय कुमार आणि ब्रॉंझ पदक
विजेता कुस्तीगीर योगेश्वरर दत्त यांना देशातील सर्वोच्च असा 'राजीव गांधी
खेलरत्न पुरस्कार' मिळाल्याबद्दल आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या नरसिंग यादव,
आदित्य मेहता, सुधा सिंग या मुंबईकर खेळाडूंचेही अभिनंदन केले आहे.
कविताला राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धतील उत्कृष्ठ कामगिरीबाबत हा
पुरस्कार जाहीर होणे अपेक्षित होते असे भुजबळ म्हणाले. कविता राऊत भुजबळ
फौंडेशनच्या 'नाशिक फेस्टिवल' ची ब्रँड अँम्बेसेडरही आहे.

थोडे नवीन जरा जुने