विलासराव,एक अष्टपैलू नेतृत्व – आ.जयवंतराव जाधव

बाभळगावंचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रिय मंत्री असा विलासरावांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे.
 दिलखुलास,हजरजबाबी,सतत हसतमुख व प्रसन्न चेहऱ्याचे व्यक्तिमत्व असलेल्या विलासरावांची प्रशासनावर असलेली पकड वाखाणण्याजोगी होती आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय प्रवास झाल्यामुळे प्रशासकीय नस माहित असलेले ते जाणकार व्यक्तिमत्व होते.
 महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात क्रिडा,युवक कल्याण,सांस्कृतिक ,गृहनिर्माण,महसुल अशा विविध खात्यांचा कार्यभार त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळला होता.विधानसभा व  विधानपरिषदेच्या निवडणूकीत पराभूत होवूनही पराभवाने खच्चून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यावी असे राजकीय यश मिळवून राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यात ते यशस्वी झाले हे केवळ त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळेच. राजकारणाबरोबरच कला,क्रिडा,सांस्कृतिक,सहकार व सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची दैदिप्यमान कामगिरी आहे.
विलासरावांच्या निधनाने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
थोडे नवीन जरा जुने