ताण-तणावातून आनंदाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे सिध्द समाधी योग-सुहास फडके (नाशिक)

विचारग्रस्त आणि तणावाखाली असणाऱ्या मनाला शांत करण्याची एक शास्त्रशुध्द
पध्दती म्हणजे सिध्द समाधी योग (एस.एस.वाय) आहे, या माध्यमातून
ताण-तणावातून आनंदाकडे जाण्याचा मार्ग हजारो साधकांनी अनुभवला आहे, यातच
आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शनिवार पासून नाशिकमध्ये सुरु होणाऱ्या
वर्गामध्ये सहभागी होऊन अधिकाधिक नाशिककरांनी याचा फायदा घ्यावा असे
प्रतिपादन सिध्द समाधी योग संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते सुहास फडके
यांनी नाशिककरांना उद्देशून केले.

श्र्री ऋषी संस्कृती विद्या केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून
सिडकोतील मथुरा गार्डन येथे पहाटे साडेपाच वाजता आणि सायंकाळी साडेसहा
वाजता गंगापूर रोड – सहदेव नगर येथील कार्यालयात हा अभ्यासक्रम संपन्न
होणार आहे. या वर्गातून प्रत्येकाला त्याच्यातील प्रचंड आंतरिक क्षमतेची
ओळख करून देऊन मानवी उत्थानाचे कार्य चालवते जाते. एस.एस.वाय मुळे
सृजनशीलता व कार्यक्षमता वाढते तसेच कामात अधिक आनंद उत्साह वाटू लागतो.
व्यावसायिकांना वेळेचे नियोजन करण्याची महत्वपूर्ण कला प्राप्त होते.
आनंदी जीवनाची गुरुकिल्ली गवसते. यातून तणाव आणि व्याधींपासून मुक्ती
मिळण्यास मदत होते असे ते म्हणाले.

सिध्द समाधी योग (एस.एस.वाय) म्हणजे हसण्याची क्षमता, रडण्याची क्षमता,
गाण्याची क्षमता, नृत्याची क्षमता, इतरांवर प्रेम करणं शिकणं होय. समाधी
अभ्यासामुळे शरीराला आणि मनाला सखोल विश्र्रांती मिळते. तणावयुक्त
मनःस्थितीमुळे होणाऱ्या आजारांवर समाधी अभ्यास हा एक यशस्वी उपचार सिध्द
झाला आहे. आरोग्य, व्यावसायिक नेतृत्वकुशलता, विद्यार्थ्यांमध्ये शंभर
टक्के स्मरणशक्ती, वैयक्तिक सबंधात परिवर्तन इत्यादी एस.एस.वायचे फायदे
आहेत. १४ वयोगटापुढील कुणीही यामध्ये सहभागी होऊ शकतो. यातून मधुमेह,
रक्तदाब, दमा, सांधेदुखी, निद्रानाश, आम्लपित्त, स्थुलता, हदयविकार या
आणि अशासारख्या मानसिक तणावामुळे होणाया विकारांमध्ये औषधांशिवाय आराम
पडू शकतो असे फडके यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी रमेश सानप (९०२८००४१४३) आणि अनिल डेरले (९४२२७०७८३०)
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने