दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची मागणी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष
निलेश राउत यांनी भुजबळ फार्म येथे नाशिक जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक वाघ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष छबू नागरे, विद्यार्थी काँग्रेसचे
कार्यकर्ते शेखर शिंदे



नाशिक : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना विनासायास शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने या भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत यांनी दिली. राऊत यांनी नाशिक जिल्हयातील संघटनेच्या सदयस्थितीबाबत भुजबळ फार्म येथे शहर आणि ग्रामीण शाखेची बैठक घेवून आढावा घेतला.
  नाशिक जिल्हा शाखेने यापूर्वी प्राध्यपकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान. त्यांनी पेपर तपासण्यावर टाकलेला बहिष्कार यावर पाठपुरावा केला होता. तर शहर शाखेने नुकतीच गुटख्याची होळी करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला होता जिल्हाध्यक्ष दिपक वाघ आणि शहर अध्यक्ष विकी चाबुकस्वार त्यांनी सांगितले.यापुढील काळात संघटनेने विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवावे असे राऊत यांनी सांगितले.
  सर्व महाविद्यालयातील शौचालये स्वच्छ रहातील याकडे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष दयावे, तसेच आसाममधील नागरिकांच्या संरक्षणासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा .त्यांच्यातील असुरक्षततेची भावना कमी करून त्यांना धीर दयावा त्यांचे स्थलांतर होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सुचना राऊत यांनी दिल्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणार्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्रयांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
  संघटनेची बांधणी यापुढील काळात महाविद्यालय स्तरावर करून विद्यार्थ्यांना रोजगाराबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी युवक कॉंगे्रसचे नाशिक शहर अध्यक्ष , छबू नागरे , जिल्हा अध्यक्ष ऍड.रविंद्र पगार यांनी राऊत यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.





थोडे नवीन जरा जुने