येवला शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या पालखेड धरणात यंदा पावसाअभावी पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने शहरवासीयांसमोर गेल्या महिनाभरात घोर संकट निर्माण झाले आहे. जिल्हाधिकार्यांनी शहरासाठी १२ टँकर मंजूर केले आहेत, तर येवला तहसीलदारांनी येवला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी येवला व बाभूळगाव शिवारातील एकूण १३ खासगी विहिरी अधिग्रहण केल्या आहेत.
यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने पालखेडसह काही धरणांतील पाण्याची परिस्थिती बेताचीच आहे. त्यातही भविष्यातील पाणी नियोजन करण्यासाठी पालखेडमध्ये जे पाणी आज आहे त्याचे आरक्षण करण्यात आल्याने रोटेशनअभावी येवला शहर मोठ्या संकटात सापडले आहे. पालखेडकडून न मिळाल्याने यंदा येवला नगरपालिकेचा टप्पा २ चा विस्तीर्ण असा ५० दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाणीसाठवण तलाव २९ जुलैलाच कोरडाठाक पडल्याने नगरपालिकेसह सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. गेल्या १९ दिवसांत पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी शहरवासीयांची मोठी वणवण दिसत असून पालिकेने ४ जुलैपासून पालिकेच्या जुन्या आठ एम सेंफ्टीच्या गंगासागर १ साठवण तलावात इकडून तिकडून वाहून आलेल्या पावसाच्या पाण्यावर पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला. मात्र आता हा छोटा गंगासागर साठवण तलावही कोरडाठाक पडला आहे. हरीश सोनार यांनी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी १३ खासगी विहिरी अधिगृहित केल्या आहेत.
दरम्यान, पालखेडचे धरण हे एक छोटे धरण असून हे धरण जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या पालखेड धरणात ६० टक्के पाणीसाठा असला तरी तो पुरेसा नाही. जोपर्यंत पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतके पाणी धरणांमध्ये उपलब्ध होत नाही तोपर्यंत काटकसर करून पाणी वापरण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता अंकुश देसाई यांनी सांगितले.