येवल्यातील मद्यपी शिक्षकाने तीन दुचाकींना दिलेल्या धडकेत विंचुर येथील पिता-पुत्राचा अंत

लासलगाव-विंचूर रस्त्यावर आज सायंकाळी भरधाव वेगाने स्विफ्ट मारूती कार चालविणार्‍या मद्यपी शिक्षकाने तीन दुचाकींना दिलेल्या धडकेत विंचुर येथील पिता-पुत्राचा अंत झाला असून अन्य सात जण जखमी झाले.
बच्चु उर्फ सुनील जोशी (४७) व त्यांचा मुलगा ओम (८) अशी मृतांची नावे आहेत. लासलगाव विंचुर रस्त्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करुन येवला येथील शिक्षक ज्ञानेश्‍वर वामन भागवत (४0) याने त्यांची मारुती स्विप्ट गाडी क्रमांक एमएच १४ बी.के ५८८५ ही भरघाव वेगाने चालवित आत्माराम होळकर यांच्या वस्तीजवळ हिरो होंडा स्प्लेंडर गाडी क्रमांक एम.एच १६ पी ९३९७, हिरो होंडा गाडी क्रमांक एम.एच १५ सी झेड-३0६0 व बजाज प्लॅटीना क्रमांक एम.एच. १५ जि.बी-४४६७ या तिन दुचाकींना जोराची धडक दिली.
विंचुर येथील पत्रकार बच्चु उर्फ सुनील मनोहर जोशी व त्यांचा मुलगा ओम, श्री व मुलगी गायत्री हे तिघे दुचाकी (एमएच १४, बीके ५८८५) वरून लासलगावकडून विंचूरकडे जात होते. त्यांच्या दुचाकीला स्विफ्ट कारने समोरून ठोकर दिल्याने चौघेही जखमी झाले. त्यांना उपचारार्थ लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ मोहन वारके यांनी सुनील जोशी व त्यांचा मुलगा ओम यांना मृत घोषित केले. तर कु.गायत्री सुनील जोशी(११) व मुलगा श्री याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार करुन नासिक येथे पाठविले. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथुन टाकळी विंचुर येथील घरी दुचाकीवर निघालेले जखमी किरण भिमराव पवार (४0 रा.टाकळी विंचुर) ,सौ मनीषा किरण पवार (वय-३१रा.टाकळी विंचुर), अभिषेक किरण पवार (वय-११रा.टाकळी विंचुर) व ैअजीत किरण पवार (वय-७ रा.टाकळी विंचुर) या सहा जणांवर लासलगावी बोराडे हॉस्पीटलमध्ये उपचार केले . अपघाताचे भयानक दृश्य होते. सोमनाथ धोडीराम हगववणे हे गंभीर जखमी झाल्याने बोराडे हॉस्पीटलमध्ये डॉ. अमोल बोराडे यांनी उपचार करुन पुढील उपचाराकरीता त्यांना नासिक येथे पाठविले. या अपघातात विंचुर येथील पौरोहित्य करणारे व जोशी यांचे अपघाती निधन झाल्याने विंचूरकर हळहळले. ते मनमिळावु स्वभावाचे होते. जोशी यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जोशी यांच्या सोमवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लासलगाव पोलिसांनी येवला येथील चालक ज्ञानेश्‍वर वामन भागवत (४0) यास अटक केली आहे. संतप्त नागरिकांनी ज्ञानेश्‍वर वामन भागवत याला चांगलाच चोप दिला.
थोडे नवीन जरा जुने