येवला तालुका पोलिस स्टेशनचे सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक.......................

मुळ गाव सोलापुर मधील करमाळा असलेले आणि सध्याचे येवला तालुका पोलिस निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक (सन्मानचिन्ह)पोलिस महासंचालकांनी जाहिर केलेले आहे.
भिवंडी येथे १९९२ साली त्यांनी पोलिस उपनिरिक्षक म्हणून आपली कारकिर्द सुरु केली. वेळोवेळी २०० पारितोषिके मिळवुन आणि पदोन्नती मिळून ते सध्या येवला तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. या पुर्वी त्यांनी शांतीनगर भिवंडी, बॉम्बशोधक पथक ठाणे, विशेष सुरक्षा पथक मुंबई, चोपडा, जामनेर, कोपरगांव येथे कर्तव्य बजावलेले आहे.
                 १ मे रोजी नाशिक येथे विशेष सभारंभात त्यांना पदक देण्यात येणार आहे. त्यांना येवलान्यूज.कॉमतर्फे शुभेच्छा

थोडे नवीन जरा जुने