स्पिक एशिया या सर्व्हे कंपनीचे काम येवल्यातील अनेक जण करतात. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. नुकत्याच येणाऱ्या काही उलटसुलट बातम्या आणि स्टार न्यूज ने केलेल्या बातमीमुळे या कंपनीची चौकशी चालु आहे. या चौकशीसाठी या कंपनीची खाती सिल केल्याचे समजते. त्यामुळे या कंपनीत पैसे गुंतलेले अनेक स्पिक एशियन त्रस्त झाले असुन त्यांच्या रोजगाराचे साधन हिरावल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. स्पिक एशियाच्या कार्यपध्दतीबद्दल येवल्यातल्या सभासदाची कोमतीही तक्रार नाही. तसेच त्यामुळे आपल्याला चांगला रोजगार मिळालेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. तरी रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधामुळे त्यांचे नुकसान होत आहे . त्याबद्दल येवल्यातल्या स्पिक एशियम नी नुकतेच येवला तहसिलदारांना या संदर्भात निवेदन दिले आहे. तहसिलदारांतर्फे सदरचे निवेदन नायब तहसिलदार शरद घोरपडे यांनी स्विकारले आहे.