येवले शहरापासून अवघ्या २ किमीवर असलेल्या जि.प प्राथमिक शाळेत एकही शिक्षक नसल्याने संतप्त गांवकरी एकत्र आले व त्यांनी सदरहू शाळेला कुलुप लावले. या शाळेत सध्या फक्त एकच शिक्षीका असून ती रजेवर गेल्यावर दुसरे शिक्षक आलेच नसल्याने सदर प्रकार घडला. नंतर पंचायत समितीच्या पदाधिकारी जागे झाले व त्यांनी दुपारच्या सत्रात शिक्षकांची पुर्तता करुन सदरचे कुलुप उघडले. या प्रकारने सर्वत्र नाराजी असुन पुर्ण शिक्षक प्रत्येक शाळेत नेमावेत अशी मागणी पारेगावकर करीत आहे.