येवला तालुक्यातील मुरमी येथे नुकतीच वृक्ष दिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला गेला. या वेळी मा.भुजबळ साहेबांचे स्विय सहाय्यक श्री.बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . यावेळेस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष रोपांची वाजतगाजतदिंडी काढली . या कार्यक्रमास तहसिलदार अनिल पवार कृषीअधिकारी कुळधर,पं.स.अध्यक्ष आर.डी.खैरनार, पुंडलिक कदम, हितेंद्र पगार व ग्रामस्थ उपस्थित होते.