येवला तालुक्यातील घरकुल कामाच्या योजनेत गैरव्यवहार झाला असून या प्रश्नी सबंधीतांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करणेत यावा अशी मागणी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी नुकतेच या सबंधीत कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक जगताप यांना निवेदन दिले आहे. या प्रसंगी अजित पवार , वैभव सोनवणे व भिल्ल समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.