येवला स्टेट बॅकेचा भोंगळा कारभार........२५ हजाराची चोरी चोर फरार सीसीटीव्ही बंद........

येवला येथील स्टेट बॅकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीला स्लिप भरून देण्यास मदत करण्याच्या बहाण्याने एका भामड्याने २५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. सावरगांव येथील मधुकर गोविंद कांबळे हे स्टेट बॅकेत पैसे भरण्यासाठी ५ तारखेला दुपारी गेले होते. त्यावेळी त्यांना स्लिप भरून देणेसाठी मदत करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीने पैसे मोजून देणेच्या बहाण्याने पैसे ताब्यात घेऊन फरार झाला. याबाबत येवला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रसंगी स्टेट बॅकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघडकीस आले आहे. स्टेट बँकेच्या या भोगळ्या कारभाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत आज युवानेते संभाजी पवार यांनी मॅनेजरला जाब विचारला आहे. स्टेट बँकेबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यांच्या कर्मचाऱ्यामध्ये कोणताही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.


थोडे नवीन जरा जुने