येवल्यातील गणेश चाळ व बाजारतळाजवळील बांधकामाचा निकाल ५ जुलै ला ?

                         येवला शहरातील गणेश चाळ येथील बांधकामाच्या अनियमितेबाबत असलेली मा.उच्च न्यायालयातील जनहित याचिका १०९/ २००३ ची सुनावणी चालू झाली असून सदरच्या याचिकेचा अंतिम निर्णय येत्या बुधवारी होण्याची शक्यता आहे . दि. ८ जून ,२२ जून, २९ जून ला या जनहित याचिकेच्या बाबतीत कार्यवाही झाली आहे. 
                            याबाबतची पार्श्वभूमी अशी कि दिपक पाटोदकर यांनी यासंदर्भात विविध अर्ज केले होते. नंतर त्यांनी मा.उच्च न्यायालय मुंबई येथे या बांधकामाविरोधात याचिका केली. यापुर्वी त्यांनी बाजारतळातील व महामार्गालगतच्या बांधकामाविरोधात जनहित याचिका केली होती तिचा निकाल लागून सदरचे बांधकामे जमिनदोस्त करावे लागले होते. या पुर्वीचा अनुभव लक्षात घेतला असल्याने याने बाधित होणारे दुकानमालक धास्तावले आहेत. याबाबतचे अधिक वृत्त उद्या प्रकाशित होईल.
थोडे नवीन जरा जुने