येवला पटेल कॉलनीमध्ये घरफोडीत तीन लाख रुपयांची चोरी

येवला शहरातील पटेल कॉलनीत असलेल्या दतानगर भागामध्ये चोरट्यांनी गुरुवारी (ता. ६) मध्यरात्री केलेल्या घरफोडीत रोख ३ लाख १४ हजार रुपये चोरले आहेत.
येथील गरेज व्यावसायीक जितेंद्र बोरस्ते हे काल रात्री शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यसाठी गेले होते. चोरट्यांनी संधीचा फायदा घेत रात्री घर फोडले. घरात बोरस्ते यांची आजी झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी कपाट तोडून आत असलेली रोख रक्कम पळविली. बोरस्ते हे गेल्या ३ वर्षापासून गॅरेज व्यवसायातून मिळालेले पैसे गाळा घेण्यासाठी जमवून ठेवत होते. 
दरम्यान, चोरट्यांनी शेजारील दिनेश भंडारी यांचेही बंद घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व वस्तू उचुकून सापडलेले १ हजार रुपयेही पळविले. मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पवार, पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे यांनी आज (गुरुवार) भेट देवून माहिती घेतली.



थोडे नवीन जरा जुने