येवल्याजवळ ट्रक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये आज (बुधवार) दुपारी झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,येवल्याजवळ 6 किलोमीटर अंतरावर येवला कोपरगाव रोडवरील पिंपळगाव जलाल शिवारात म्हसोबा मंदिरानजिक ट्रक व मिनिडोर मध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातात दहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेले कोपरगाव व येवला येथील रहिवासी आहेत. अन्य नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना शिर्डी व नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांची नावे -
हिरामण दगडू काटकर (वय ४५, रा. कोपरगाव), संगीता श्रीकांत गायके (वय ४०, रा. कोपरगाव), उषा रमेश कुमावत (वय ५० रा. चाळीसगाव), प्रियांका शिंदे (वय २६) व त्यांची मुलगी श्रद्धा शिंदे (वय ४), अन्य चार मृतांची ओळख पटलेली नाही.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे -राहुल निकम, कैलास वाघ, अनिल सोनवणे, महेंद्र हेगडयाल, रमेश कुमावत, योगिता गायके इतर जखमींची नावे समजू शकलेली नाही