राजापूर येथे रक्षा विसर्जनावरून हाणामारी

राजापूर। दि. 1 - विहिरीत पडून मृत्यू झालेल्या विवाहितेच्या सासरच्या लोकांना माहेरच्या लोकांनी रक्षाविसर्जनास मज्जाव करून अरेरावी व शिवीगाळ केल्याने दोघा गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना राजापूर येथे घडली़ 31 मे 2011 रोजी येथील सोमनाथ नामदेव चव्हाण यांच्या विहिरीत त्यांची पत्नी सीमा सोमनाथ चव्हाण पडली़
दवाखान्यात नेत असताना सीमाचा मृत्यू झाला़ मुलीचा मृत्यू झाल्याने मुलीचे वडील भागीनाथ जयराम शिंदे, रा़ भौरी, ता़ नांदगाव यांना व नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाल्याने सासरच्या लोकांनीच मुलीचा घात केल्याने अंत्यसंस्काराच्या वेळी मुलीकडील मंडळी शिवीगाळ करीत मृतदेहाला सासरच्या लोकांनी हात लावायचा नाही, अशी भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने अंत्यसंस्कार राजापूर येथेच करण्यात आल़े अंत्यसंस्काराच्या वेळी मुलीकडील नातेवाईक गोंधळ घालीत हमरीतुमरी करीत होत़े मात्र दुसर्‍या दिवशी रक्षाविसर्जन कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलीकडील नातेवाईकांनी विशेषत: महिलांनी मुलाकडील एका महिलेला उचलून विहिरीत टाकण्यासाठी नेत असल्याने संतप्त राजापूरच्या मंडळीनी मुलीकडील लोकांना व महिलांना बेदम चोप दिला़ पोलिसांत तक्रार दाखल होऊन आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला तरी मुलीकडील मंडळी गप्प राहत नव्हत़े एवढेच नव्हे तर गावाला व प्रतिष्ठित लोकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याने राजापूरच्या लोकांनी भौरीच्या महिला व लोकांना चोप दिला़ त्यामुळे वातावरण सध्या तरी शांत दिसत आह़े माहेरून पाच तोळे सोन्याचे दागिने घेण्यासाठी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने मुलीने आत्महत्त्या केल्याची फिर्याद मुलीचे वडील भागीनाथ शिंदे यांनी दिली़ त्यावरून येवला व तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल होऊन मुलाकडील सोमनाथ चव्हाण, नामदेव चव्हाण, कमलाबाई चव्हाण, संजय चव्हाण, देवीदास चव्हाण, कल्पना चव्हाण आदिंना अटक करण्यात येऊन पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आह़े पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील कुर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मालसे, वाघ, ढेकळे, बागुल, देवरे, वनवे तपास करीत आ
हे.
दै .लोकमत वरून साभार.......
थोडे नवीन जरा जुने